Mumbai News | मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईतील पायधूनी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया वय ४०, नसरीन डोकाडिया वय ३५ आणि त्यांच्या मुली आयशा वय १६ व झैनब वय १३ अशी करण्यात आली आहे.
मुंबईतील पायधूनी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. मृतांची ओळख अब्दुल्ला डोकाडिया वय ४०, नसरीन डोकाडिया वय ३५ आणि त्यांच्या मुली आयशा वय १६ व झैनब वय १३ अशी करण्यात आली आहे. हे कुटुंब पायधूनीतील घाटी गल्ली परिसरातील मुघल इमारतीत राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने नातेवाईकांसह जेवण केले होते. त्यानंतर त्यांनी बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. जेवणानंतर काही वेळातच सर्वांना उलट्या, जुलाब, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला.
तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांना तातडीने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी प्रथम एका मुलीला मृत घोषित केले, त्यानंतर दुसऱ्या मुलीचा आणि काही वेळातच आई-वडिलांचाही मृत्यू झाला. या प्रकरणात अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतड्यातील अन्नाचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
