Slab collapsed : कामगार रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीचा स्लॅब कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही

| Updated on: Jul 06, 2022 | 9:59 PM

ठाण्यातील वागळे परिसरात असणाऱ्या कामगार रुग्णालयाचा तिसऱ्या मजळ्यावरील टेरेसच्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग (Slab collapsed) कोसळला आहे. झाडाची फांदीही तुटली.

Follow us on
ठाण्यातील वागळे परिसरात असणाऱ्या कामगार रुग्णालयाचा तिसऱ्या मजळ्यावरील टेरेसच्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग (Slab collapsed) कोसळला आहे. झाडाची फांदीही तुटली. या आवाजाच्या भीतीने रुग्णालयातील उपचार घेणारी महिला विमल शेट्ये (वय 73) या खाटेवरून खाली पडल्या. त्यांच्या हनुवटीवर मार लागला असून 4 ते 5 टाके लावण्यात आले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून रुग्णालयातील (Hospital) उपचार घेणाऱ्या 9  जणांना बाजूच्या दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व ठाणे महानगपालिकेचे सहायक आयुक्त, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती आणि सहायक आयुक्त वागळे इस्टेट प्रभाग समिती आणि अग्निशामक दलाचे (Firebrigade) अधिकारी आणि जवान 1-फायर वाहनासह उपस्थित होते. तर याबाबत स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले.