दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंसमोरच रामदास कदमांविरोधात घोषणाबाजी

| Updated on: Oct 15, 2021 | 9:45 PM

शिवसेनेचा आज दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दसरा मेळाव्यात प्रकृती बरी नसल्याने रामदास कदम उपस्थित राहू शकले नाहीत. या दसरा मेळाव्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

Follow us on

कथित ऑडिओ क्लीपमुळे शिवसेना नेते रामदास कदम वादात अडकले आहेत. शिवसेनेचा आज दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दसरा मेळाव्यात प्रकृती बरी नसल्याने रामदास कदम उपस्थित राहू शकले नाहीत. या दसरा मेळाव्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या कार्यक्रमाला रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम उपस्थित होते. त्यांनी यावेळ ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमाला रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम उपस्थित होते. त्यांनी यावेळ ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “खरं तर आम्ही या दसरा मेळाव्यासाठी दोन वर्षांपासून उत्सूक होतं. कोरोना संकटामुळे त्यांना प्रत्यक्षपणे सभेत भाषण करताना बघता आलं नव्हतं. कुठेही कुणी स्टेटमेंट दिलेली नाहीत. रामदास कदम यांनी त्यांची बाजू स्पष्ट केलेली आहे. अनिल परब यांच्या बाजूने किंवा पक्षाच्या बाजूने भूमिका आलेली नाही. जे सत्य आहे, जो होणाप आहे तो होणारच आहे”, असं सिद्धेश कदम म्हणाले.