Special Report | अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी, कार्यकर्ते आक्रमक !

| Updated on: Oct 08, 2021 | 9:15 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि खुद्द शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यानंतर आता पुण्यात अजित पवार यांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी काऊन्सिल हॉलसमोर मानवी साखळी तयार केली. अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवार यांचा शुक्रवारी पुणे दौरा असतो. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

पुण्यात दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. तसंच त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. केंद्र सरकारचे पाहुणे गेल्यानंतर मी या छापेमारीवर बोलेन, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, केंद्र सरकारच्या यंत्रणा अधिकाराचा गैरवापर करत असल्याची टीका शरद पवार यांनी काल केली होती.