Special Report | Bhagwant Mann यांनी आईसमोर शपथ घेतली आणि Punjab जिंकलं-Tv9

| Updated on: Mar 12, 2022 | 9:50 PM

मान यांनी केजरीवाल यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं. आपने पंजाबमधील 117 जागांपैकी 92 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले.

Follow us on

चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर आता आम आदमी पार्टीने सत्ता स्थापण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आपचे खासदार भगवंत मान हे येत्या 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या आधी 13 मार्च रोजी भगवंत मान हे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह अमृतसरमध्ये भव्य रोड शो करणार आहेत. पंजाबमध्ये सत्ता मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मान यांनी केजरीवाल यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं. आपने पंजाबमधील 117 जागांपैकी 92 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले. तर माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही पराभूत व्हावं लागलं आहे.