Special Report | राज्यातील भाजप नेते निवडणुकीच्या मूड आणि मोडमध्ये, भाजप कोअर कमिटी बैठकीत साडे चार तास खल

Special Report | राज्यातील भाजप नेते निवडणुकीच्या मूड आणि मोडमध्ये, भाजप कोअर कमिटी बैठकीत साडे चार तास खल

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 9:30 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी पदोन्नती आरक्षणासह विविध विषयांवर ठाकरे सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरण्याबाबत चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजधानी दिल्लीतील गाठीभेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी पदोन्नती आरक्षणासह विविध विषयांवर ठाकरे सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरण्याबाबत चर्चा झाली. तशी माहिती आमदार आशिष शेलार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.