Special Report | काहीच मंत्र्यांचा शपथविधी, कोर्टाच्या निर्णयाची भीती?-tv9
इतर 3 नावांवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. तर शिंदे गटाकडून 4 मंत्री शपथ घेतील असं सूत्रांकडून कळतंय. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, केसरकर शपथ घेतील अशी माहिती आहे, इतर 2 मंत्र्यांना मंथन सुरु आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जे बोलले ते फार गंभीर आहे…सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण गंभीरतेनं घेतलं असून, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार..आणि पुन्हा राज्यपालांना उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करावं लागेल असं जयंत पाटील म्हणालेत. आधी जयंत पाटलांचं म्हणणं ऐका…हीच भीती म्हणून की काय ?, 19 जुलै जी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवण्यात येतेय..त्यात फार कमी मंत्री शपथ घेतील, अशी माहिती tv9ला सूत्रांनी दिलीय. भाजपकडून 3 किंवा जास्तीत जास्त 5 मंत्री शपथ घेतील अशी माहिती आहे. त्यात चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटलांची नावं सध्या निश्चित झालीत. इतर 3 नावांवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. तर शिंदे गटाकडून 4 मंत्री शपथ घेतील असं सूत्रांकडून कळतंय. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, केसरकर शपथ घेतील अशी माहिती आहे, इतर 2 मंत्र्यांना मंथन सुरु आहे.
