Special Report | नवनीत राणांची खासदारकी धोक्यात? हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान

Special Report | नवनीत राणांची खासदारकी धोक्यात? हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान

| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 9:38 PM

खासदार नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत आली आहे. त्याचं कारण म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे. त्याबरोबर नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी अडचणीत आली आहे. त्याचं कारण म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवलं आहे. त्याबरोबर नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय. शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, नवनीत राणा यांच्या वडिलांचंही जात प्रमाणपत्र अवैध ठरलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, नवनीत राणा उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.