Special Report | हिंदुत्वाच्या आंदोलनात मागासवर्गीय अँगल कसा आला?-tv9

Special Report | हिंदुत्वाच्या आंदोलनात मागासवर्गीय अँगल कसा आला?-tv9

| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 9:43 PM

नवनीत राणांच्या कथित ''पाण्या''च्या आरोपाला मुंबई पोलिसांनी ''चहा''नं उत्तर दिलंय. दलित असल्यामुळे पाणी नाकारण्याचा आरोप करणाऱ्या नवनीत राणांचा चहा पितानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. मागासवर्गीय आहे म्हणून पोलिसांनी पाणी न दिल्याचा आरोप नवनीत राणांनी केला होता. त्यासाठी त्यांनी थेट लोकसभाध्यक्षांना पत्रही लिहिलं.

हिंदुत्व आणि हनुमान चालिसेसाठी पेटलेल्या प्रकरणाला नवनीत राणांच्या आरोपांनी
मागासवर्गीयाचा अँगल मिळालाय. मात्र त्यादरम्यान नवनीत राणांच्या कथित ”पाण्या”च्या आरोपाला मुंबई पोलिसांनी ”चहा”नं उत्तर दिलंय. दलित असल्यामुळे पाणी नाकारण्याचा आरोप करणाऱ्या नवनीत राणांचा चहा पितानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. मागासवर्गीय आहे म्हणून पोलिसांनी पाणी न दिल्याचा आरोप नवनीत राणांनी केला होता. त्यासाठी त्यांनी थेट लोकसभाध्यक्षांना पत्रही लिहिलं. मात्र जर आम्ही पाणी नाकारलं असेल, तर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये चहा कसा काय दिला, असा प्रश्न मुंबई पोलीस विचारतायत. खुद्द मुंबईच्या पोलीस आयुक्तांनीच राणा दाम्पत्य पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाचा व्हिडीओ ट्विट केलाय. आता राणा आडनाव लावणारी व्यक्ती मागासवर्गीयात कशी मोडते, असा ज्यांना प्रश्न पडला असेल, त्यांनी आधी पार्श्वभूमी समजून घ्या.

नवनीत राणा मूळ पंजाबी आहेत. त्यांचं माहेरकडचं नाव नवनीत कौर आहे. मुंबईत त्या वाढल्या. माहितीनुसार त्यांची पंजाबमधली मूळ जात लुभाणा आहे. पंजाबमध्ये लुभाणा हा समाज मागासवर्गीयात मोडतो की मग ओबीसींमध्ये, याबद्दल माहिती मिळालेली नाही. नवनीत कौर यांची मुंबईत रवी राणांशी ओळख झाली. रवी राणा हे राजपूत समाजातून येतात . त्यामुळे रवी राणांशी लग्नानंतर नवनीत कौर या नवनीत राणा झाल्या. मात्र लग्नानंतर पत्नीची मूळ जात बदलत नाही. त्यामुळे अमरावतीच्या राखीव मतदारसंघातून त्यांनी लोकसभेत अर्ज भरला. पण आरोपांनुसार हा अर्ज भरताना नवनीत राणांनी लुभाणाऐवजी मोची समाजाचं जातप्रमाण दाखवलं. यावर प्रकरण कोर्टात गेलं. हायकोर्टानं नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र रद्द केलं आणि त्यांना 2 लाखांचा दंडही सुनावला. सध्या या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय.

नवनीत राणांवर काय आरोप होतायत, त्याआधी त्यांनी लोकसभाध्यक्षांना नेमकं काय
पत्र लिहिलं होतं, त्यावर एक नजर टाका. 23 तारखेला मला खार पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं. पूर्ण रात्र मी तिथंच होते. त्यादरम्यान मला तहान लागली. मी पोलिसांकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. त्यावर एक पोलीस म्हटला की, तुम्ही मागासवर्गीय असल्यामुळे इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही. हे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितलं. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरुमही वापरु दिला गेला नाही. जातीवरुन हिणवलं गेलं. मागच्या अनेक महिन्यांपासून नवनीत राणा हिंदुत्ववादी भूमिकेनं चर्चेत आहेत. शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा उभारुन त्यांनी आरती केली. नंतर शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्न विचारले….हनुमान चालिसेसाठी त्यांनी अमरावती ते मुंबई दौरा केला. त्यांच्या जातप्रमाणपत्राचा वाद सोडला, तर याआधी कधीही त्यांच्या मागासवर्गीयपणावरुन वाद उभा राहिला नाही…मग नेमकं आत्ताच त्यांनी मागासवर्गीयाचा मुद्दा बाहेर का काढला, असा प्रश्न त्यांना विचारला जातोय.

दरम्यान, जर नवनीत राणांच्या आरोपात तथ्य असेल, तर नवनीत राणांना नेमक्या कोणत्या
अधिकाऱ्यानं मागासवर्गीयाचं कारण देऊन पाणी नाकारलं? त्याचं नाव नवनीता राणा सांगतील का? त्याच्याविरोधात तक्रार दाखल करतील का? याचीही प्रतीक्षा आहे. जर आजही महाराष्ट्रात एक खासदार महिलेला मागासवर्गीय म्हणून पाणी दिलं जात नसेल, राणांच्या आरोपांनुसार जर महाराष्ट्र खरोखर इतका प्रतिगामी असेल? तर नवनीत राणांच्या 12 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना याआधी असा अनुभव आला नाही का? आणि समजा जर राणांचे आरोप खरे असतील, तर त्यांनी यापुढे हिंदुत्वाचा झेंडा खाली उतरवून जातीअंताचा लढा सुरु करायला काय हरकत आहे?

Published on: Apr 26, 2022 09:42 PM