Special Report | ठाकरे-शिंदेंमधला सत्तासंघर्ष रस्त्यावर, उदय सामंतांची गाडीच फोडली

| Updated on: Aug 03, 2022 | 9:19 PM

पुण्यात मंगळवारी आदित्य ठाकरेंचीही सभा होती आणि मुख्यमंत्री शिंदेंचीही तानाजी सावंतांच्या घराजवळ कात्रज चौकात आदित्य ठाकरेंची सभा होती. आदित्य ठाकरेंची सभा संपल्यामुळं शिवसैनिकांची कात्रज चौकात गर्दी होतीच. त्यातच सिग्नलवर उदय सामंतांची गाडी दिसताच हल्ला झाला झाला.

Follow us on

पुण्यात शिंदे गटाचे आमदार उदय सामंतांच्या गाडीवरील हल्ल्याची ही दृश्यं..गद्दार गद्दार म्हणत सामंतांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात, त्यांच्या गाडीची काचही फुटली. तर हा हल्ला शिवसैनिकांनी केला असून हल्ल्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप उदय सामंतांनी केलाय. विशेष म्हणजे हा हल्ला होण्याच्या एक दिवसाआधीच हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरातांनी, शिंदे गटाच्या आमदारांची गाडी फोडा, अशी चिथावणी दिली होती.या प्रतिक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी पुण्यात उदय सामंतांच्या गाडीला टार्गेट केलं.
आता पुण्यात सामंतांच्या गाडीला कसं टार्गेट केलं ते आधी समजून घ्या. पुण्यात मंगळवारी आदित्य ठाकरेंचीही सभा होती आणि मुख्यमंत्री शिंदेंचीही तानाजी सावंतांच्या घराजवळ कात्रज चौकात आदित्य ठाकरेंची सभा होती. आदित्य ठाकरेंची सभा संपल्यामुळं शिवसैनिकांची कात्रज चौकात गर्दी होतीच. त्यातच सिग्नलवर उदय सामंतांची गाडी दिसताच हल्ला झाला झाला.