Special Report | Sanjay Raut यांचे Kirit Somaiya यांच्यावर आरोपांचे बाण पण निशाणा ED वर? -Tv9
शिवसेना खासदार संजय राऊत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रातले भाजप सरकार, ईडी आणि राज्यातले भाजप नेते यांची अक्षरशः पिसे काढली. फायलीमधून एकामागून एक कागद बाहेर काढून त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. ईडी सुनो, मै नंगा आदमी हुँ. जितेंद्र नवलानी कौन है, असे म्हणत ईडीच्या वसुली एजंटांची कुंडली मांडली.
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रातले भाजप सरकार, ईडी आणि राज्यातले भाजप नेते यांची अक्षरशः पिसे काढली. फायलीमधून एकामागून एक कागद बाहेर काढून त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. ईडी सुनो, मै नंगा आदमी हुँ. जितेंद्र नवलानी कौन है, असे म्हणत ईडीच्या वसुली एजंटांची कुंडली मांडली. राऊत म्हणाले, मुळात पीएमची घोटाळ्यातील आरोपीनं सोमय्याच्या जवळच्या माणसाला जमीन का विकली, असा सवाल करत, हा भ्रष्टाचाराशी लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय. आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजनं करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमय्याचा फ्रंटमॅन आहे. त्याच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
