Special Report | शिवसेना कुणाची यानंतर आता शाखांवरुन शंखनाद-tv9

Special Report | शिवसेना कुणाची यानंतर आता शाखांवरुन शंखनाद-tv9

| Updated on: Aug 03, 2022 | 9:25 PM

उद्या कोर्टात शिवसेना कुणाची हा फैसला जरी झाला, तरी शिंदे गट आणि शिवसेना यातला वाद सहजासहजी मिटणार नाही. डोंबिवलीतला हा राडा त्याचीच एक झलक आहे...कारण, ज्या शहरात ज्या गटाचं वर्चस्व आहे, तो गट त्या शहरातल्या शाखांवर दावा सांगू शकतो.

शिवसेना कुणाची याच्या मालकीवरुन वाद सुरुय. नेमके कुणाचे आमदार अपात्र होणार, याचीही केस कोर्टात गेलीय., आणि आता शिवसेनेच्या शाखा कुणाच्या यावरुन रस्त्यावर दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. हा प्रकार डोंबिवलीतल्या शिवसेना शाखेत. शिवसेना कुणाची हा वाद अजून मिटलेला नाही., मात्र त्याआधीच शिवसेनेच्या शाखेवर कुणाचा अधिकार असेल, यावर वाद सुरु झाले आहेत. डोंबिवलीतल्या या शाखेत एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे फोटो लावण्यात आले होते. ते फोटो शिवसैनिकांनी काढले. त्यानंतर पुन्हा शिंदे समर्थकांनी ते फोटो लावल्यामुळे दोन्ही गट भिडले. या वादात शिवसेनेच्या कार्यकर्त्या कविता गावंड यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उद्या कोर्टात शिवसेना कुणाची हा फैसला जरी झाला, तरी शिंदे गट आणि शिवसेना यातला वाद सहजासहजी मिटणार नाही. डोंबिवलीतला हा राडा त्याचीच एक झलक आहे…कारण, ज्या शहरात ज्या गटाचं वर्चस्व आहे, तो गट त्या शहरातल्या शाखांवर दावा सांगू शकतो.

 

Published on: Aug 03, 2022 09:25 PM