अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्… कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन

अतिसुरक्षित लोकभवन परिसरात धक्कादायक घडलं! अचानक मोठा आवाज झाला अन्… कर्तव्य बजवत असतानाच जवानाने संपवलं जीवन

| Updated on: Jul 07, 2026 | 11:10 AM

मुंबईतील अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या लोकभवन परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबई पोलीस आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे असे या जवानाचे नाव आहे. ते SRPF Group 16 कोल्हापूर येथील तुकडीमध्ये पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईतील राजभवन सुरक्षेसाठी करण्यात आली होती.

आज लोकभवन परिसरातील लोक भवन येथे ते गार्ड ड्युटीवर तैनात होते. ड्युटीदरम्यान त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडल्याचे सांगितले जात आहे. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत कौस्तुभ सांगळे यांचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर राजभवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या जवानाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Published on: Jul 07, 2026 11:09 AM
Follow Us