SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, प्रकरण कसं आलं समोर?

SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, प्रकरण कसं आलं समोर?

| Updated on: May 05, 2026 | 6:15 PM

एसआरपीएफ भरती परीक्षेबाबत एक गंभीर प्रकार समोर आला आहे. गट ५, दौंड येथे झालेल्या लेखी परीक्षेत खासगी प्रकाशनातील सराव प्रश्नांपैकी ८५ प्रश्न तंतोतंत विचारण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एसआरपीएफ भरती परीक्षेबाबत एक गंभीर प्रकार समोर आला आहे. गट ५, दौंड येथे झालेल्या लेखी परीक्षेत खासगी प्रकाशनातील सराव प्रश्नांपैकी ८५ प्रश्न तंतोतंत विचारण्यात आल्याचा आरोप होत आहे. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेक उमेदवारांनी सांगितले की प्रश्नांची मांडणी आणि पर्यायही जवळपास तसेच होते, त्यामुळे ही परीक्षा निष्पक्ष होती का याबाबत शंका निर्माण झाली आहे. एका व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप वरुन ही माहिती समोर आल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काहींनी प्रश्नपत्रिका आधीच फुटल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. काही नेत्यांनीही या मुद्द्यावर आवाज उठवत सरकारकडून स्पष्ट उत्तर मागितले आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटल्याचं दिसतं. सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणांवर ठाम मत मांडलं असून सरकारवर हल्लाबोल केला आहे. (tv9मराठी कोणत्याही ग्रुप चॅटची पुष्टी करत नाही)

Published on: May 05, 2026 06:09 PM
Follow Us