सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्जाचं सव्वा सहा कोटी मध्ये सेटलमेंट झाल्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी. अंबानींच्या मीडिया नेटवर्कनं आपल्या बाबत अफवा पसरवल्या, एसएल समूहाचे संस्थापक आणि माध्यम उद्योजक सुभाष चंद्रांचा हा आरोप आहे. सुभाष चंद्रा यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं रिलायन्स ग्रुपने म्हटलंय. एसएल समूहाचे संस्थापक आणि माध्यम उद्योजक सुभाष चंद्रा यांनी रिलायन्स ग्रुपच्या मीडिया नेटवर्कवर केलेले आरोप […]
22 हजार कोटींच्या कर्जाचं सव्वा सहा कोटी मध्ये सेटलमेंट झाल्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी. अंबानींच्या मीडिया नेटवर्कनं आपल्या बाबत अफवा पसरवल्या, एसएल समूहाचे संस्थापक आणि माध्यम उद्योजक सुभाष चंद्रांचा हा आरोप आहे. सुभाष चंद्रा यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं रिलायन्स ग्रुपने म्हटलंय.
एसएल समूहाचे संस्थापक आणि माध्यम उद्योजक सुभाष चंद्रा यांनी रिलायन्स ग्रुपच्या मीडिया नेटवर्कवर केलेले आरोप रिलायन्स ग्रुपने फेटाळून लावलेत. मात्र या आरोपांमुळे भारतीय उद्योग समूहात एका नव्या वादाची चर्चा रंगली आहे. सुमारे 22 हजार कोटींच्या कर्जाचे सेटलमेंट 6.25 कोटींमध्ये झाल्याचा निर्णय राष्ट्रीय कंपनी कायदे न्यायाधिकरणानं दिल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात. 22 हजार कोटींच्या या प्रकरणामध्ये एसएल समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा हे गॅरेंटर आहेत. याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर कर्ज परतफेडीच्या निर्णयाची सध्या देशभरात मोठी चर्चा आहे. या निर्णयामुळे कर्ज देणाऱ्या बँकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मात्र या प्रकरणावरून सुभाष चंद्रा यांनी रिलायन्स समूहावर बदनामीचे आरोप केलेत. दुसरीकडे रिलायन्स समूहाने सुभाष चंद्रा यांचे सर्व आरोप फेटाळलेत. अंबानींच्या मीडिया नेटवर्कने यासंदर्भात अफवा पसरवल्याचा आरोप सुभाष चंद्रा यांनी केलाय. सुभाष चंद्रा नेमकं काय म्हणाले पाहूयात.
मी कोणत्याही कर्जदात्याकडून कोणतेही पैसे कर्ज म्हणून घेतलेले नाहीत. व्यावसायिक समूहाच्या संपत्तीला खासगी संपत्ती म्हणून सांगितलं गेलं. पण ज्या कर्जदार कंपन्यांसाठी मी वैयक्तिक हमी दिली होती, त्या कंपन्यांनी आतापर्यंत 43 हजार कोटी रुपयांची परतफेड केली आहे. वैयक्तिक दिवाळखोरीच्या कार्यवाहीमध्ये आपल्याविरोधात एकूण दावा केवळ 3 हजार 992 कोटींचा होता, 22 हजार कोटींचा नाही. या कर्जात मी केवळ वैयक्तिक हमीदार होतो, मूळ कर्जदार नव्हतो. अंबानी यांच्या मीडिया समूहातील एका वाहिनीने 22 हजार कोटी रुपयांचे कर्ज 6.5 कोटींमध्ये निकाली काढल्याचा खोटा दावा पसरवला. हमारे ग्रुप की टोटल देनदारी 45,000 की है 42,000 उसमे से दे दिया गया, 43,000… 2,000 बचा तो बाकी 3,900 कहाँ से आ गया… लांछन लगाया गया के मेरे पास बहुत ज़्यादा वेल्थ थी जब हमने लोन लिया, लेकिन बाद में हमने कुल 31 करोड़ रुपये की दिखाई। जो 22,000 करोड़ रुपया लोग बोलते हैं, केवल 3,900 करोड़ के लगभग था। हमारे ग्रुप की एंटीटीस सब लोग कमिटेड हैं हर एक का एक-एक पैसा चुकाने में। कहीं किसी ने रिकॉर्ड पर लिख दिया ग्रुप की जितनी मार्केट कैपिटलाइजेशन थी उसको ले लिया, उसको मेरा निजी संपत्ति के रूप में दिखा दिया। मुझे इस देश के ऐसे लोगों से जोड़ के देख रहे हैं या दिखा रहे हैं। आपको यही रिक्वेस्ट करूंगा की आप किसी की बहकावे में मत आइए।
दरम्यान मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स ग्रुपने एसएल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. रिलायन्स ग्रुपचं स्पष्टीकरण. सुभाष चंद्रा यांनी केलेल्या निराधार वक्तव्यांची आम्ही दखल घेतली आहे. रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या मीडिया संस्थांवरती करण्यात आलेले आरोप आम्ही फेटाळून लावतो. रिलायन्स ग्रुपच्या मालकीच्या अनेक मीडिया संस्था आहेत. या मीडिया ब्रँडचा वापर कधीही कुणावर हल्ला करण्यासाठी करण्यात आलेला नाही आणि भविष्यातही केला जाणार नाही. एक व्यावसायिक आणि उद्योजक म्हणून आम्ही सुभाष चंद्रा यांचा मोठा आदर करतो. आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.
