दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक

दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो! सुनेत्रा पवार भावुक

राखी राजपूत | Updated on: Feb 16, 2026 | 9:52 AM

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर आणि निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विजयी उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्या भावूक झाल्या, दादांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दादांचे स्वप्न नक्कीच साकार कराल असा विश्वास त्यांनी उमेदवारांना दिला.

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर आणि त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. विजयी उमेदवारांसमोर केलेल्या आपल्या पहिल्या भाषणात त्या भावूक झाल्याचे दिसले. “अजित दादांच्या जाण्याने आपण पोरके झालो आहोत,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील विजयी उमेदवारांची बैठक घेतली. त्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “तुम्ही दादांचे स्वप्न नक्कीच साकार कराल याची मला खात्री आहे.” त्यांनी सर्व उमेदवारांना आश्वासन दिले की, त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील. दादांच्या मनातले काम आणि काम हे ध्येय घेऊन सर्वांनी पुढे जायचे आहे, असेही आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले. त्यांच्या या शब्दांनी कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली.

Published on: Feb 16, 2026 9:52 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us