राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब, इंदापुरात नव्या वादाला तोंड फुटलं!
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात घडला. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा फोटोच बॅनरवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. 27 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, या बॅनरवरील फोटो गायब प्रकरणामुळे पक्षांतर्गत राजकारणाच्या चर्चांना उधाण आले असून, यामागील नेमके कारण काय, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
