Baramati By Election Result | बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय; इंदापूर चौकात झळकले अभिनंदनाचे बॅनर

| Updated on: May 04, 2026 | 7:23 PM

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत राज्यात नवा इतिहास रचला आहे.

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत राज्यात नवा इतिहास रचला आहे. मतमोजणीनंतर बारामतीतील इंदापूर चौकात सुनेत्रा पवार देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्याचा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल कार्यकर्त्यांकडून आणि समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निवडणुकीपूर्वीच मतदारांना सुनेत्रा पवार यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. अखेर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत बारामती पोटनिवडणुकीत आपली ताकद सिद्ध केली आहे.

 

 

Published on: May 04, 2026 07:23 PM
Follow Us