Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार? हायकोर्टात कोणाची याचिका? प्रकरण नेमकं काय? काय केली मागणी?

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार? हायकोर्टात कोणाची याचिका? प्रकरण नेमकं काय? काय केली मागणी?

| Updated on: Nov 18, 2025 | 12:41 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांनी केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष असलेल्या शुक्ला यांनी मनसेची मान्यता रद्द करण्याचीही मागणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अमराठी मुद्द्यांवरून प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत राज ठाकरे यांच्यावरील गुन्हे नोंदवण्यासोबतच मनसेची मान्यता रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

न्यायालयाने या याचिकेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. याचिकेमधून उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक हे शब्द वगळण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला चार आठवड्यांमध्ये यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Published on: Nov 18, 2025 12:41 PM