संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर…

संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर…

| Updated on: Nov 22, 2026 | 12:00 PM

खासदार सुनील तटकरे यांनी संजय राऊतांना त्यांच्या पक्षातून फुटलेल्या खासदारांवर आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. महिला आरक्षण विधेयकावर खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेचे तटकरेंनी कौतुक केले. राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत, निराधार आरोप करणे लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी स्वतःच्या पक्षातून सुरुवातीला किती खासदार फुटले आणि 2024 च्या निवडणुकीनंतरही का बाजूला गेले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला तटकरे यांनी दिला. इतरांवर बोट दाखवण्याऐवजी स्वतःच्या अपयशाचे चिंतन करण्याची प्रवृत्ती वाढली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, महिला आरक्षण विधेयकासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेचे तटकरे यांनी कौतुक केले.

डिलिमिटेशन बिल येईल तेव्हा सर्व राज्यांमध्ये समान पद्धतीने जागा वाढतील, अशा बिलाला राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन राहील, ही सुळे यांची भूमिका स्वागतार्ह असल्याचे तटकरे म्हणाले. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची आगाऊ रक्कम घोषित केली असून, केंद्र सरकारकडे एनडीआरएफ अंतर्गत मोठा प्रस्ताव पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून भरीव मदत मिळेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वजण पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी निराधार आरोप करणे टाळावे आणि लोकशाहीचे अवमूल्यन करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Nov 22, 2026 12:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us