Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 November 2021
अमरावती: गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ काल समाजातील एक गटाने केलेल्या लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आजही दिसत आहे. आज सकाळी अमरातीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या टपरीतील सामान आधी काढून घेण्यात आले होते. मात्र भर बाजारातील या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.