Arun Gawli : ‘डॅडी’ अखेर तुरुंगाबाहेर, ‘या’ हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर

Arun Gawli : ‘डॅडी’ अखेर तुरुंगाबाहेर, ‘या’ हत्या प्रकरणात अरुण गवळीला जामीन मंजूर

| Updated on: Aug 28, 2025 | 6:04 PM

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या २००७ मधील खून प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

अंडरवर्ल्ड डॉन अशी ओळख असणाऱ्या अरुण गवळी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. माजी आमदार आणि कुख्यात गुंड अरुण गवळी याला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवक जामसंडेकर २००७ मधील हत्या प्रकरणात अरुण गवळीला दिलासा मिळाला आहे. कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. ज्यासाठी गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुण गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अरुण गवळीकडून जामीनासाठी अर्ज करण्यात येत होते. दरम्यान आता सुप्रीम कोर्टाकडून या प्रकरणात अरूण गवळीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरुण गवळीची बाजू अ‍ॅड. हडकर आणि अ‍ॅड. मीर नगमन अली यांनी मांडली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांनी कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात तुरुंगात दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे अरुण गवळीची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

Published on: Aug 28, 2025 05:47 PM