Ambedkar Jayanti | हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार – सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाच्या मूल्यांवर भर देत देश चालवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी संविधानाच्या मूल्यांवर भर देत देश चालवण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या की, दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतो. ज्यांनी देशाला समानतेवर आधारित सर्वोत्तम संविधान दिले, त्या युगपुरुषांपुढे नतमस्तक होत नवीन ऊर्जा घेण्याची ही परंपरा आहे. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र आणि देशातील जनतेने संविधानाला केंद्रस्थानी ठेवूनच कार्य केले पाहिजे. “हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही, तर फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसारच चालतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. देश आणि राज्याची सेवा करताना संविधानिक मूल्यांचे पालन करणे हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली असल्याचेही सुळे यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्याने संविधानाच्या महत्त्वाबाबत पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.
