Phaltan Doctor Death : तुमचं लेकरू निष्पाप, तुम्ही तोंड झाकून… सुषमा अंधारे वडवणीत पीडित कुटुंबियांच्या भेटीला
सातारा येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. ग्रामस्थ आणि अंधारे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी निंबाळकरांवर आरोप करत, शवविच्छेदन अहवालातील त्रुटी आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वडवणी येथे एका डॉक्टर महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्याचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. गावातील नागरिक या घटनेवर आक्रमक असून, त्यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनही केले होते.
सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन निंबाळकरांवर गंभीर आरोप केले होते. तपासादरम्यान आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी बोट ठेवले. शवविच्छेदन अहवालातील वेळेची नोंद, फोनच्या तपासणीवरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, अशा अनेक मुद्द्यांवरून त्यांनी पोलीस आणि तपास यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डॉ. संपदा यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यानंतर आज सुषमा अंधारे आणि काही महिला नेत्या पीडित कुटुंबीयांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे.
