बेवड्यांचं काही खरं नाही… मुख्यमंत्री होताच थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर; दारूबाबत घेतला मोठा निर्णय

बेवड्यांचं काही खरं नाही… मुख्यमंत्री होताच थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर; दारूबाबत घेतला मोठा निर्णय

| Updated on: May 12, 2026 | 10:59 AM

तामिळनाडूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे सत्तांतर पाहायला मिळाले असून, अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षाने दमदार कामगिरी करत सत्तेवर झेंडा रोवला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवर जनतेने विश्वास दाखवत विजय यांच्या पक्षाला मोठा पाठिंबा दिला. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासांतच मोठा निर्णय घेत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांच्या 500 मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

तामिळनाडूमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे सत्तांतर पाहायला मिळाले असून, अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षाने दमदार कामगिरी करत सत्तेवर झेंडा रोवला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवर जनतेने विश्वास दाखवत विजय यांच्या पक्षाला मोठा पाठिंबा दिला. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासांतच मोठा निर्णय घेत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांच्या 500 मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. या निर्णयाअंतर्गत तब्बल 717 सरकारी ‘तासमॅक’ दारू दुकाने बंद करण्यात येणार आहेत. सरकारच्या आदेशानुसार, पुढील दोन आठवड्यांत ही कारवाई पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.

तामिळनाडूमध्ये दारूच्या दुकानांचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत होता. विशेषतः महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरातील दारू विक्री केंद्रांवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत होती. महसुलाचे मोठे स्रोत असूनही थलपती विजय सरकारने हा निर्णय घेतल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तामिळनाडूपुरता मर्यादित नसलेला हा प्रश्न देशातील अनेक राज्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, विजय यांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

 

Published on: May 12, 2026 10:59 AM
Follow Us