Bhaskar Jadhav : मी मंत्री झालो नाही तर… ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या विधानाची चर्चा
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाच्या एका जाहीर मेळाव्यात मोठा दावा केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
लवकर आपलं सरकार येणार, मी मंत्री होणार असा दावा ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. मंत्री नाही झालो तरी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईल, असं मोठं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. भास्कर जाधवांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘विधानसभेच्या अध्यक्षाला कोण काही बोलतं का?’ असा सवाल करत तुमचा भास्कर जाधव बोलला की नाही बोलला? असं वक्तव्य करत उपस्थितांना प्रतिसवाल केल्याचे पाहायला मिळाले. पुढे भास्कर जाधव असेही म्हणाले की, तुम्हाला आताच सांगतो लवकरच आपलं सरकार येणार आहे आणि मी मंत्री पण होणार, असा दावा भास्कर जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या जाहीर मेळाव्यात केला.
दरम्यान, यावेळी भास्कर जाधवांनी रामदास कदम यांच्यावर टीका करत आव्हान दिलं. रामदास कदम यांचा बामदास छमछम असा उल्लेख भास्कर जाधवांनी केला. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, तो मूर्ख, हे येडं आहे. रोज सकाळ संध्याकाळ उद्धव ठाकरेंवर बोलतो. रामदास कदम स्वतःच पोराला संपवतोय, असं म्हणत त्यांनी रामदास कदमांवर निशाणा साधला.
