TV9 मराठीच्या बातमीची दखल! दोन बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग; ठाण्यात रस्त्यांची तात्पुरती डागडुजी
ठाण्यात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोन नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. या प्रकरणाची दखल घेत संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचे काम सुरू केले आहे. खड्ड्यांमध्ये डांबर टाकून वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दरम्यान, या गंभीर समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले होते. तसेच या प्रश्नावर माध्यमांनीही सातत्याने आवाज उठवला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र, स्थानिक नागरिकांकडून आणि वाहनचालकांकडून करण्यात आलेल्या आरोपांनुसार, अनेक ठिकाणी केवळ तात्पुरत्या स्वरूपात डांबर टाकून खड्डे बुजवण्यात आले असून, कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याची टीका होत आहे. काही ठिकाणी पावसामुळे पुन्हा खड्डे उघडे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.