Mumbai : ‘त्या’ 40 आमदारांचा असा ‘हा’ निषेध, शिवसेनेची बॅनरबाजी चर्चेचा विषय

| Updated on: Sep 25, 2022 | 4:12 PM

बंडखोर आमदारांबद्दल शिवसेनेकडून जहरी टीका तर होत आहेच पण मध्यंतरी अनेकांची कार्यालयेही फोडण्यात आली होती. आता तर मुंबईतील घाटकोपर येथे केला गेलेला निषेध चर्चेचा मुद्दा ठरत आहे.

Follow us on

Mumbai | 40 गद्दारांच्या आत्म्याला शांती मिळू दे, शिवसेनेची घाटकोपरमध्ये बॅनरबाजी-TV9

मुंबई : शिवसेनेतील ‘त्या’ 40 आमदारांनी घेतलेली भूमिका ही शिवसैनिकांच्या पचनी पडलेलीच नाही. आता सत्तांतराला तीन महिने झाले तरी शिवसैनिकांकडून (Shivsainik) वेगवेगळ्या पद्धतीने रोष व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत निषेध व्यक्त केला जात होता, बंडखोर आमदारांची (Rebel MLA) कार्यालयेही फोडण्यात आली होती. पण मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथे तर बंडखोर 40 आमदारांचे पिंडदानच करण्यात आले आहे. शिवाय ‘त्या’ 40 गद्दारांच्या आत्माला शांती मिळू दे असे बॅनरही लावण्यात आले आहे. बॅनरबाजीतून शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला जात आहे.एकीकडे गद्दार म्हणून त्यांना हिणवले जात असतानाच आता त्यांच्या जिवंतपणीच पिंडदान करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गट याला नेमके कसे उत्तर देणार हे पहावे लागणार आहे. मुंबईतील घाटकोपर येथे प्रकार घडला आहे.