परळ गणेश कार्यशाळेत गणेशमूर्तींवर अखेरचा हात, यंदा प्रभावळ कमी करणार
गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे.आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्व जण आतूर झाले असताना आता गणेशमूर्तींची उंची थोडी कमी करण्याची योजना आहे.
मुंबईचा गणेश उत्सव जगप्रसिद्ध आहे. मुंबईतील गणेशोत्स त्यातील उंच गणेशमूर्तीसाठी प्रसिध्द आहे. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चंदनवाडीचा गणेश या मंडळांच्या गणेशमूर्ती खूपच उंच असतात. या मूर्तींमुळे विसर्जन करताना आणि गणेशमूर्तींना रस्त्यावरील खड्डे आणि इतर कारणांमुळे धोका निर्माण झाला आहे. तसेच मुंबईतील 16 ब्रिज नादुरुस्त झाल्याने तसेच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने गणेशमूर्तींना मोठा धोका असल्याने बृन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीने मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे. तसेच यंदा गणेशमूर्ती जास्त उंच होऊ नयेत म्हणून मूर्ती भोवती असलेली प्रभावळ कमी करण्याचा निर्णय घतेला आहे.
Published on: Aug 23, 2024 06:34 PM
