मोठी बातमी! ज्या परिसरात अजितदादांचं विमान अपघात झाला, तिथंच विमान कोसळलं, बारामतीत पुन्हा खळबळ

मोठी बातमी! ज्या परिसरात अजितदादांचं विमान अपघात झाला, तिथंच विमान कोसळलं, बारामतीत पुन्हा खळबळ

| Updated on: May 13, 2026 | 10:40 AM

बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोजुबावी गावाच्या हद्दीत रेडबर्ड कंपनीचे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात वैमानिकाचा जीव वाचला असून तो सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तांत्रिक बिघाड की इतर काही कारण याचा तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरात याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली होती. त्या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख स्थानिक चर्चांमध्ये केला जात असला, तरी अधिकृत तपास अहवालाबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बारामती परिसरातील विमान प्रशिक्षण सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बारामतीमध्ये कारवार एव्हिएशन आणि रेडबर्ड या दोन संस्था वैमानिक प्रशिक्षण देतात. यापूर्वीही रेडबर्ड कंपनीच्या विमानांचे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे प्रशिक्षण प्रक्रियेतील सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, “टेबल टॉप धावपट्टीवर पायलटचे निर्णय आणि अनुभव अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, आजचा अपघात नेमका कशामुळे झाला यावर डीजीसीए आणि संबंधित कंपनीचा अहवाल आल्यानंतरच भाष्य करणे योग्य ठरेल,” असे म्हटले आहे.
तसेच, “दादांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असेही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.

Published on: May 13, 2026 10:40 AM
Follow Us