तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
पुण्यातील दुकानावरील कारवाईच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने FDA ची कानउघाडणी करत 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘कारवाईचा अतिरेक होऊ लागला आहे’, अशा शब्दांत कोर्टाने FDA ला सुनावलं. नियमांची पूर्तता करूनही परवाना पूर्ववत न केल्याबद्दल ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील गुरुनानक डेअरीविरोधात तक्रार आल्यानंतर FDA ने तपासणी केली होती. स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्याने दुकानाचा परवाना […]
पुण्यातील दुकानावरील कारवाईच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने FDA ची कानउघाडणी करत 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘कारवाईचा अतिरेक होऊ लागला आहे’, अशा शब्दांत कोर्टाने FDA ला सुनावलं. नियमांची पूर्तता करूनही परवाना पूर्ववत न केल्याबद्दल ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील गुरुनानक डेअरीविरोधात तक्रार आल्यानंतर FDA ने तपासणी केली होती. स्वच्छतेसंदर्भात त्रुटी आढळल्याने दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्यानंतर दुकानदाराने नियमांचे पालन केल्याचा दावा करत अपील केलं. फेरतपासणीत 98 टक्के नियमांचे पालन झाल्याचं आढळून आलं, तरी परवाना पूर्ववत करण्यात आला नाही. त्यामुळे दुकानदाराने हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने FDA वर 5 लाखांचा दंड ठोठावत दुकानाचा परवाना पूर्ववत करण्याचे आदेश दिले असून, दंडाची रक्कम एका महिन्यात दुकानदाराला देण्याचेही निर्देश दिले आहेत.
