Dahi Handi 2022 | राज्यभरात दहीहंडीचा मोठा थरार; tv9 मराठीत दहीहंडीचा उत्साह

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूरसह इतर ठिकाणी दहीहंडी मोठा उत्साहात साजरी केली जात आहे. लाखोंची बक्षीस देण्यात येत आहेत. याचीच हे काही व्हिडीओ

Dahi Handi 2022 | राज्यभरात दहीहंडीचा मोठा थरार; tv9 मराठीत दहीहंडीचा उत्साह
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 19, 2022 | 1:38 PM

देशभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यातही अनेक ठिकाणी लहान-मोठ्या प्रमाणात दहीहंडी फोडली जात आहे. कुठे मंदीरात तर कुठे मैदानात गोविंदा दहीहंडीचा सण सजरा करताना दिसत आहेत. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूरसह इतर ठिकाणी दहीहंडी मोठा उत्साहात साजरी केली जात आहे. लाखोंची बक्षीस देण्यात येत आहेत. याचीच हे काही व्हिडीओ

Dahi Handi 2022 | राज्यभरात दहीहंडीचा मोठा उत्साह-tv9

तब्बल दोन वर्षानंतर राज्यभरात दहीहंडीचा उत्साह घुलायला सुरूवात झाली आहे. दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. दादर येथील मानाची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी हजेरी लावली आहे. घाटकोपरमध्येही बालगोपाळांचाही उत्साह दिसून येत असतानाच जोगेश्वरीतील जय जवान मंडळाची हंडी फोडण्यासाठी गोविंदा तयार झाले आहेत

IDEAL Dadar Dahi Handi 2022 | आयडियल मंडळात महिला पथकाने मानाची दहिहंडी फोडली – tv9

दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह जोरात असतानाच आयडियल दहीहंडी ही महिला गोविंदा पथकाने फोडली. तसेच यातील एका महिला गोविंदाने नही झुकूंगा सालाची स्टाईल करत उपस्थितांची मने जिंकली.

Nashik Dahi Handi Celebration | नाशिकच्या मनमाडमधील महादेव मंदिरात कृष्णजन्माष्टमी साजरी – tv9

देशभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात ही मोठ्या जोमात कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहाने साजरा केला जात आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये ही कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या भक्ती भावाने साजरा केला गेला. मनमाडमधील महादेव मंदिरात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली गेली.

Worli Jambori Dahi Handi 2022 | वरळीत दहीहंडीवरून राजकारण तापलं, शिवसेनेकडून विरोधात पोस्टरबाजी

कुठं दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत असतानाच कुठं राजकारणही केलं जात असल्याची टीका पहायला मिळत आहे. वरळी जांभोरी येथे भाजपने दहीहंडी करण्याचे ठरवल्यानंतर येथे शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात येत आहे. त्यावरून वरळीतील राजकारण तापणार हे  शक्यता वर्तवली जात आहे.

Dahi Handi 2022 | मुंबई-ठाण्यामध्ये मनसेची दहीहंडी-tv9

गिरगावात मनसेकडून भव्य दहीहंडीच्या आयोजन करण्यात आलेलं आहे. येथे दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. तर मनसेने अधीच पारंपारिक बाज सांभाळत ही दहीहंडी पार पाडू असे सांगितले होते. त्याप्रमाणे आता गिरगावात मनसेकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

Girgoan MNS Dahi Handi 2022 | गिरगावात मनसेची बॅनरबाजी – tv9

गिरगावात मनसेकडून भव्य दहीहंडीच्या आयोजन करण्यात आलेलं आहे. दरम्यान मुंबईतील मलबार हिल येथेही मनसेकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसेने बॅनरबाजी केल्याचेही दिसत आहे.

MP Amol Kolhe यांच्या उपस्थितीत tv9 मराठीत दहीहंडीचा उत्साह – tv9

दहीहंडीचा उत्साह राज्यात सुरू आहे. गल्ली ते दिल्ली असा दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत. यादरम्यान दहीहंडीचा जल्लोष tv9 मराठीच्या कार्यालयातही पहायला मिळाला. पहिल्यांदाच खासदार अमोल कोल्हे हे कन्हैया बनल्याचे पहायला मिळाले. तसेच त्यांनी येथील दहीहंडीही फोडली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें