Air India Plane : हवाई प्रवास नको रे बाबा… प्रवाशांना भरली धडकी, बघा विमानाच्या आजच्या ‘या’ दोन मोठ्या घटना
एअर इंडियाच्या बोईंगच्या ड्रीमलायनर विमानातील तांत्रिक बिघाड आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांना सतावणाऱ्या घटना घडताना दिसताय. अशातच आज दिवसभरात दोन मोठ्या विमानाच्या घटना घडल्यात.
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. ही दुर्घटना १२ जून रोजी घडली. या अपघातग्रस्त विमानात पायलट आणि २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज प्रवासी होते. मात्र टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातच हे विमान एका निवासी भागात कोसळलं आणि मोठी दुर्घटना घडली. यामध्ये तब्बल २७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर सामान्य प्रवाशांमध्ये विमान प्रवास करण्याची धडकी भरली आहे. तर ज्यांना विमान प्रवास करण्याची इच्छा आहे त्यांनी या अपघातानंतर धस्का घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदाबाद येथील घटना ताजी असताना आज लखनऊ विमानतळावर आणखी एक घटना घडली आहे. काल रविवारी सकाळी लखनऊमध्ये विमान लँड होत असताना सौदी अरेबियाच्या सौदी एअरलाईन्सच्या विमानाच्या पुढच्या चाकांमधून अचानक धूर आल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे आज हाँगकाँगहून दिल्लीला जाणाऱ्या विमान आकाशात गेल्यानंतर त्यात काही तांत्रिक बिघाड असल्याची शंका आली आणि ते माघारी फिरले. या दोन्ही घटना आज दिवसभर चर्चेत आहे.
