मोठे मोठे गार केले गंमतमध्ये; 6 खासदारांच्या फुटीनंतर उदय सामंतांचं स्टेटस व्हायरल!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेचा विषय ठरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये “मोठे मोठे गार केले गंमतमध्ये” असा मजकूर शेअर केला आहे. या स्टेटससोबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही पोस्ट केला आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदारांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सामंत यांचे हे स्टेटस राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. अनेकांनी या स्टेटसचा संबंध सध्याच्या राजकीय घडामोडींशी जोडत विविध तर्क-वितर्क मांडण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांना वेग आला असताना उदय सामंत यांच्या या स्टेटसमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. मात्र, या स्टेटसबाबत किंवा त्यामागील नेमक्या उद्देशाबाबत उदय सामंत यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात या घटनाक्रमाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.