तर आमच्या शिष्टमंडळात या! ठाकरेंचे आरोप, फडणवीसांचं प्रत्युत्तर

तर आमच्या शिष्टमंडळात या! ठाकरेंचे आरोप, फडणवीसांचं प्रत्युत्तर

| Updated on: Oct 16, 2025 | 11:03 AM

निवडणूक आयोगाच्या कारभारावर ठाकरे बंधूंनी ताशेरे ओढल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्या सुधारेपर्यंत निवडणुका न घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी भाजपला आव्हान दिले आहे की, जर त्यांची ढवळाढवळ नसेल तर त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळात सामील होऊन मतदार यादी सुधारण्याची मागणी करावी. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

निवडणूक आयोगासोबत दोन दिवस चाललेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आयोगाच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे की, जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. त्यांनी पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याचा संदर्भ देत, याद्या सुधारण्यासाठी आणखी सहा महिने लागल्यास फरक पडणार नाही, असे म्हटले. ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे की, जर त्यांचे या प्रक्रियेत कोणतेही ढवळाढवळ नसेल, तर त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळात सामील होऊन मतदार याद्या सुधारण्याची मागणी करावी. या आरोपांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच विजयी होणार असल्याचा दावा केला. विरोधकांना मतदार यादीतील गडबडीचा मुद्दा पराभवानंतर रडण्यासाठी वापरण्याची सवय असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Oct 16, 2025 11:03 AM