Thackeray vs Fadnavis : कफनचोर vs चोरांचे सरदार… आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, मंत्र्यांविरोधात आंदोलनावरून शाब्दिक चकमक

Thackeray vs Fadnavis : कफनचोर vs चोरांचे सरदार… आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, मंत्र्यांविरोधात आंदोलनावरून शाब्दिक चकमक

| Updated on: Aug 12, 2025 | 3:51 PM

भ्रष्टाचार आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी करत ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा महाराष्ट्रभर आंदोलन केली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा दादरच्या आंदोलनात सहभागी झाले होते. पण उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थीफ मिनिस्टर म्हणत चोरांचे सरदार अशी टीका केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही केला पलटवार

सरकार विरोधात आंदोलनातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना थेट चीफ मिनिस्टर आणि चोरांचा सरदार असं म्हटलंय. मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा शिवाजी पार्क परिसरात आंदोलनात उतरले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थीफ मिनिस्टर म्हणत चोरांचा सरदार अशी त्यांनी टीका केली. संजय शिरसाट यांच्या पैशाच्या बॅगेचा व्हिडिओ असेल विधानपरिषदेत कोकाटे यांच्या रमी खेळतानाचा व्हिडिओ असेल की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये पोलिसांनीच टाकलेल्या धाडीत सापडलेल्या 22 बार बाला असोत… तीनही प्रकरणांमध्ये विरोधक राजीनाम्यासाठी आक्रमक झालेत. पण कोकाटेंचं खाते बदलून आणि शिरसाट, योगेश कदमांना समज देऊन मंत्र्यांना माफी देण्यात आली आहे. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जनक्रोश आंदोलनाच्या माध्यमातनं रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. बघा कशी झाली शाब्दिक चकमक?

Published on: Aug 12, 2025 03:47 PM