उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट… दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीचार्जनंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. तरुण आंदोलकांवर झालेल्या कारवाईचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून अनेक नेते आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. अशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी राजकीय हालचालींना वेग दिला आहे.

दिल्लीत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत चर्चा केली असून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही फोनवर संवाद होण्याची शक्यता आहे. या चर्चेत आंदोलनासह सध्याच्या राजकीय घडामोडींवर विचारविनिमय होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
मात्र, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा होणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दोन्ही नेत्यांकडूनही कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे या संभाव्य चर्चेकडे राज्यासह देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.