मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!

मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!

| Updated on: Jun 17, 2026 | 9:55 AM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत महत्त्वाच्या हालचाली सुरू असून, आजच काही मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत असून स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हे देखील मध्यरात्री दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाऊसाहेब वाघचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आणि संजय दिना पाटील हे खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत संबंधित खासदारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, दिल्लीतील घडामोडींनंतर नेमके काय चित्र स्पष्ट होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणावर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून अधिकृत भूमिका काय मांडली जाते, याचीही उत्सुकता वाढली आहे.

Published on: Jun 17, 2026 9:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us