अर्थमंत्री कसा असावा? उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल

अर्थमंत्री कसा असावा? उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल

| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 10:26 PM

देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तक लिहिलं आणि ते देखील इकडे पाहुणे म्हणून आले आहेत. त्यामुळं आपला कार्यक्रम दुसऱ्याच्या खर्चातून कसा करावा हे आपल्याकडून शिकण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. 

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्प कसा समजून घ्यायचा यासंदर्भात एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं होतं. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले होते. अर्थमंत्री, यशस्वी अर्थमंत्री काय असतो. अर्थसंकल्प सादर होताना लोकांना आपला खिसा कापला जाणार हे कळत नाही. मात्र, अर्थमंत्री अर्थसंकल्पातून लोकांचा खिसा कापण्याचं काम करतात. देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तक लिहिलं आणि ते देखील इकडे पाहुणे म्हणून आले आहेत. त्यामुळं आपला कार्यक्रम दुसऱ्याच्या खर्चातून कसा करावा हे आपल्याकडून शिकण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.