Hindustani Bhau : कोल्हापुरीनं तोंड फोडणार…नादी लागू नको नाहीतर…हिंदुस्थानी भाऊला चोपण्याची धमकी, नेमकं काय घडलं?
कोल्हापुरातील नांदणी मठासोबत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच म्हटले. इतकंच नाहीतर कोल्हापुरातील नांदणी मठात माधुरी हत्तीण परत आली पाहिजे… ही सर्वांची इच्छा असल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोपणार, असं वक्तव्य करत ठाकरेंच्या सेनेच्या प्रशांत भिसे यांनी एकप्रकारे हिंदुस्थानी भाऊला इशाराच दिला आहे. कोल्हापुरातील नांदणी मठातून वनतारामध्ये पाठवण्यात आलेल्या माधुरी हत्ती प्रकरणावरून हिंदुस्तानी भाऊनं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक तुला एकच गोष्ट सांगतो. तू कोल्हापूरकरांना शिव्या द्यायच्या भानगडीत पडू नको. कोल्हापूरचं प्रोडक्ट माहितीये का तुला… कोल्हापुरी चप्पल…या चप्पलेने तुझं तोंड फोडणार म्हणजे फोडणार.. हे लक्षात ठेव मराठी माणसाच्या नादी लागू नको’, असा इशाराच ठाकरेंच्या सेनेच्या प्रशांत भिसे यांनी हिंदुस्थानी भाऊला दिलाय.
माधुरी हत्तीणीच्या वादामध्ये हिंदुस्थानी भाऊने एन्ट्री घेतल्याने एक वाद निर्माण झालाय. या प्रकरणाच्या एका व्हिडीओमध्ये त्याने केलेल्या भाषेवरून संताप व्यक्त करण्यात येतोय. ‘अनंत अंबानीला का बोलत आहात? तुम्ही अन्न खाता की XXX?’, अशी भाषा हिंदुस्थानी भाऊने केल्यानं कोल्हापूरकरांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
