Uddhav Thackeray | पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही; महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उरण आणि रायगड येथील नवनिर्वाचित नगरसेवकांनी मुंबईतील मातोश्रीवर जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. “पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा ही पैशाने विकत घेता येत नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर उरण आणि रायगड येथील नवनिर्वाचित नगरसेवकांनी मुंबईतील मातोश्रीवर जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन करत महायुती सरकारवर जोरदार टीका केली. “पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा ही पैशाने विकत घेता येत नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. सत्ताधाऱ्यांकडून पैशाच्या जोरावर राजकारण केले जात असल्याचा आरोप करत, जनतेशी असलेले भावनिक नाते आणि पक्षनिष्ठा यांच्यामुळेच शिवसेनेला यश मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत अनेक आव्हाने असली तरी कार्यकर्त्यांनी खचून न जाता संघटन अधिक मजबूत करावे. “आज परिस्थिती कठीण असली तरी येणारा उद्याचा काळ हा आपलाच असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उरण आणि रायगडमधून आलेल्या नगरसेवकांना संबोधित करत म्हणाले.
