Uddhav Thackeray : आता मी फडणवीसांना फोन करणार आणि…,  उपराष्ट्रपतीपदासाठी सुदर्शन रेड्डीच्या पाठिंबा दर्शवत ठाकरे काय म्हणाले?

Uddhav Thackeray : आता मी फडणवीसांना फोन करणार आणि…, उपराष्ट्रपतीपदासाठी सुदर्शन रेड्डीच्या पाठिंबा दर्शवत ठाकरे काय म्हणाले?

| Updated on: Aug 29, 2025 | 1:49 PM

एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याबद्दल माध्यमांनी विचारले असता, उद्धव ठाकरे बघा काय म्हणाले?

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आज मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपराष्ट्रपतीपदासाठी उद्धव ठाकरेंनी आपला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, एनडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी सवाल केला असता उद्धव ठाकरे यांनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

‘आता मतदार यादीतील त्यांचं नाव बघावं लागेल. फडणवीसांनी मला फोन केला, ही गोष्ट सत्य आहे. मला एका गोष्टीच आश्चर्य वाटलं, माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला. त्यांच्यासमोर माझे उमेदवार जनतेने निवडून आणले. त्यांचा पाठिंबा सुद्धा त्यांना पाहिजे. या विनंतीला काय अर्थ आहे?’ असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. तर बी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून मी आता फडणवीसांना फोन करणार असंही ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे पुढे असेही म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी न मागता पाठिंबा दिला होता. निवडून आल्यानंतर माझी अपेक्षा नव्हती पण एक कर्टसी म्हणूनदेखील फोन आला नव्हता. त्यावेळी तर मला कोणी विनंती केली नव्हती, आता गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या या पद्धतीला नाकारलं गेलं पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलं.

Published on: Aug 29, 2025 01:49 PM