Ulhas Bapat | 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

Ulhas Bapat | 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 2:47 PM

127 व्या विधेयकानुसार आणि 104 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांना आरक्षणाचे अधिकार मिळाले तरी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं मोठं विधान घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही तसंच घटनादुरुस्ती करुनही हे शक्य नाही, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.

“आता क्रमांक 127 जे विधेयक आहे, याने पुन्हा राज्यांकडे आरक्षण देण्याचे अधिकार दिलेले आहेत… दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे, 50 टक्क्यांची अट शिथिल करा, अशी लोकांची मागणी आहे… ते मात्र कदापि वाढवता येणार नाही… कारण घटना समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले होतं… समानतेचा अधिकार हा अधिकार आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे… आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही… म्हणून आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त देता येणार नाही…”

“हाच निर्णय इंद्रा सहानी केस मध्ये 9 जजेसच्या बेंचने उचलून धरला आणि हाच निर्णय परवाच्या सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचनेही उचलून धरला… त्यामुळे ही काळया दगडावरची पांढरी रेषा आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येणार नाही…”

Follow Us