Pune Rain | भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pune Rain | भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

| Updated on: May 17, 2026 | 3:14 PM

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावल्याने काही गावांमध्ये नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः मसुरकर-कोळवडी परिसरात वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून, तीन घरांवरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली आहे. तसेच काही घरांची कौलं तुटल्यामुळे घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. घरांमधील साहित्याचेही नुकसान झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. हवामानातील अचानक बदलामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 17, 2026 03:14 PM
Follow Us