Meenatai Thackeray Statue : … म्हणून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर फेकला रंग, आरोपीचा दावा काय?
दादरमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याप्रकरणी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली. आरोपीने ठाकरे कुटुंबातील संपत्तीच्या वादात हस्तक्षेप केल्याबद्दल राग व्यक्त केल्याचे समजते.
दादरमधील शिवाजीपार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याच्या प्रकरणी पोलिसांनी उपेंद्र पावसकर या नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पावसकर यांना दादर कोर्टाने २० तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, उपेंद्र पावसकरने गुन्हा कबूल केला असून त्यांनी ठाकरे कुटुंबातील संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे यांच्या हस्तक्षेपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पावसकरचा चुलतभाऊ शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. पोलीस आता पावसकर यांच्या राजकीय संबंधांचा आणि त्यांच्या हेतूचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पावसकर याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर ठाकरेंच्या सेनेतील शिवसैनिकांनी पुतळ्याचे शुद्धीकरण केले होते.
Published on: Sep 19, 2025 10:39 AM
