प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम…वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसाई संतापले; सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप!
गेल्या काही वर्षांपासून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकावरील आवैध झोपडपट्टी हटवण्साठी कोर्टात खटला सुरु होता. याचा निकाल लागताच पोलिस बल तसेच पश्चिम रेल्वे प्रशासना तर्फे कारवाई सुरू करण्यात आली यावेळी पोलीस तसेच स्थानिकांमध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळाला महत्त्वाची बाब म्हणजे यानंतर ठाकरे गटातील नेते वरुण सरदेसाई यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते वरुण देसाई यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत, ‘भाजपकडून जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार करण्यात आला’ असे म्हटले आहे. त्यांनी, “आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तेथे होते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लीम नरेटीव्ह तयार करायचा ही भाजपची जुनी स्ट्ऱॅटर्जी आहे ती परत एकदा प्रयत्न केला. जे काम रेग्युलर इनफ्रास्ट्रकचरसाठी होणार होतं, जे काम रेग्युलर इनफ्रास्ट्रकचरसाठी होणार होतं त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडून करण्यात आला” असे म्हटले आहे.