Eknath Shinde On Vedant Project | राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध व्हावा, मोंदीना विनंती

Eknath Shinde On Vedant Project | राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध व्हावा, मोंदीना विनंती

| Updated on: Sep 16, 2022 | 5:10 PM

दोन वर्षांत जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो न मिळाल्याने वेदांता यांनी तो निर्णय घेतला. यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध व्हाव्यात म्हणून विनंती केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात होणारा वेदांता प्रकल्प हा गुजरातला गेल्याने शिंदे-भाजप सरकारवर चांगलीच टीका होताना दिसत आहे. त्यानंतर आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी शिंदे यांनी सांगितलं की, आमचं सरकार येऊन दोन महिने झालं. त्यानंतर वेदांता प्रकल्पासंदर्भात मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर वेदांता यांच्याशी चर्चा केली. आमचे प्रयत्न सुरू होते. मात्र दोन वर्षांत जो प्रतिसाद मिळायला हवा होता तो न मिळाल्याने वेदांता यांनी तो निर्णय घेतला. यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध व्हाव्यात म्हणून विनंती केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Published on: Sep 16, 2022 05:10 PM