डुक्करतोंड्या… माकडतोंड्या… अजित पवारांवरून हाके अन् मिटकरींमध्ये जुंपली, थेट काढली औकात

डुक्करतोंड्या… माकडतोंड्या… अजित पवारांवरून हाके अन् मिटकरींमध्ये जुंपली, थेट काढली औकात

| Updated on: Jun 06, 2025 | 4:05 PM

अर्थ खात्याचे अर्थमंत्री, अजित पवार यांना अर्थखात्यातलं काय समजतं? अजित पवार हे काय सीए आहेत काय? असा सवाल करत लक्ष्मण हाकेंनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आज मिटकरी आणि हाके यांच्यात जुंपली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरून लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. टीव्ही ९ मराठीमध्ये झालेल्या संवादावेळी लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात शाब्दिक वाद झाले होते. या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात झालेला संवाद मला आवडलेला नाही. बोलताना प्रत्येकाला तारतम्य असलं पाहिजे. टीव्ही ९ मराठीवर बोलत असताना अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाते यांच्यावर वाद झाले. यावेळी त्यांच्या बोलण्यातील भाषेचा स्तर घसरला. डुक्करतोंड्या… माकडतोंड्या… औकात काय? अशा शब्दांचा वापर करून लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jun 06, 2025 04:05 PM