Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा

Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा

| Updated on: Oct 04, 2026 | 3:54 PM

विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे. ईव्हीएम आणि बॅलेट पेपरमधील मतांच्या विसंगतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशभरात २,५०० ठिकाणी सत्याग्रह आंदोलन सुरू असून, सत्ताधाऱ्यांनी सुधारणा न केल्यास जनता रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही त्यांनी केली.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर मतचोरीचा आरोप करत व्होट चोर गद्दी छोड चा नारा दिला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीचा संदर्भ देत, त्यांनी देशाच्या पंतप्रधानांसह गृहमंत्र्यांवर संविधानाला मोडून मर्जीतील व्यक्तींना संवैधानिक पदांवर बसवून देशाचे कॉर्पोरेट सेक्टरला विकण्याचे आणि माणसामध्ये दरी निर्माण करण्याचे काम केल्याचा आरोप केला. बॅलेट पेपर आणि ईव्हीएममधील मतांच्या विसंगतीवर वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बॅलेट पेपरवर ४४% मते मिळाली असताना, ईव्हीएममध्ये ती १४-१५% पर्यंत घसरल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ही सत्ता मतचोरी आणि बेईमानी करून मिळवल्याचा त्यांचा दावा आहे. राहुल गांधींच्या पुढाकाराने देशभरात २,५०० ठिकाणी सत्याग्रह आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी सुधारणा न केल्यास जनता त्यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्याची मागणीही त्यांनी केली.

Published on: Oct 04, 2026 3:54 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us