विजय घाडगे रुग्णवाहिका घेऊन अजित दादांच्या भेटीसाठी निघाले

विजय घाडगे रुग्णवाहिका घेऊन अजित दादांच्या भेटीसाठी निघाले

| Updated on: Jul 24, 2025 | 2:15 PM

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे रुग्णवाहिका घेऊन अजित दादांच्या भेटीसाठी निघाले आहेत.

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर रविवारी झालेल्या मारहाणीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या असून, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. विजयकुमार घाडगे म्हणाले, सूरज चव्हाण याने माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांचा जावई असल्यासारखा तो येतो आणि जामिनावर सुटका करून घेतो, हे अत्यंत चुकीचे आहे. विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, पण सुनील तटकरे यांच्यासमोर निवेदन देताना पत्ते टाकणाऱ्या माझ्यासारख्या शेतकरी कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला होतो. हे अन्यायकारक आहे. यामुळे संतप्त झालेल्या घाडगे यांनी थेट मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, मी अजित पवार यांना याबाबत जाब विचारणार आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी ॲम्बुलन्समधून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.

Published on: Jul 24, 2025 02:15 PM